सुरक्षेचे कोणतेही फलक किंवा रिफ्लेक्टर नसल्याने अपघाताचा धोका; देवरुखात वाहनचालकांचा खोळंबा
देवरुख:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मनमानी आणि भोंगळ कारभारामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धामणी येथे महामार्गावरील दुभाजक (Divider) अचानक बंद करण्यात आल्यामुळे मार्गाचा योग्य अंदाज न आल्याने एका कारचालकाचे वाहन थेट रस्त्यावर फसल्याची घटना घडली आहे.
कोणतीही पूर्वसूचना किंवा सूचना फलक नाही
महत्त्वाची बाब म्हणजे, धामणी येथील दुभाजक बंद करताना राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून वाहनचालकांना पूर्वसूचना देण्यासाठी कोणतेही सूचना फलक (Signboards) लावण्यात आलेले नाहीत. अचानक रस्ता बंद केल्यामुळे तीव्र वेगात येणाऱ्या चालकांना रस्ता किंवा दुभाजकाचा अंदाज बांधणे कठीण होत आहे.
बॅरिकेड्स अन् रिफ्लेक्टरचा अभाव
दुभाजक बंद केलेल्या ठिकाणी आवश्यक असणारे बॅरिकेड्स, रात्रीच्या वेळी चमकणारे रिफ्लेक्टर किंवा इतर कोणतीही सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. महामार्ग प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली असून वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. येथे तातडीने योग्य ते दिशादर्शक आणि सुरक्षेचे उपाय योजण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 12-08-2026














