५,५८४ विद्यार्थी अन् ५५२ नागरिकांना सेवा; ४० पेक्षा जास्त ग्राहकांसाठी विशेष कॅम्पची सोय
रत्नागिरी:
शासकीय योजनांचा लाभ, बँकिंग व्यवहार, शैक्षणिक प्रवेश, मोबाईल सिम कार्ड आणि इतर अत्यावश्यक कामांसाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. त्यामुळे आधार नोंदणी आणि अद्यावतीकरणासाठी (Update) नागरिकांची गर्दी वाढत असून, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्रांना प्रथम प्राधान्य दिले आहे.
रत्नागिरी टपाल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालू वर्षात एकूण ५,५८४ विद्यार्थी आणि ५५२ नागरिकांना आधारविषयक सेवा पुरवण्यात आल्या आहेत.
विशेष आधार कॅम्पची सुविधा उपलब्ध
एकाच वेळी ४० पेक्षा जास्त ग्राहकांसाठी विशेष आधार कॅम्प आयोजित करण्याची सुविधादेखील रत्नागिरी टपाल विभागाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी ८६६९९१९८६० या व्हॉट्सॲप क्रमांकावर मेसेज करावा, असे आवाहन रत्नागिरी डाक विभागाचे अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे.
आधार केंद्रांवर कोणत्या सुविधा मिळतात?
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या महत्त्वाच्या पोस्ट ऑफिसमध्ये ही आधार केंद्रे कार्यरत आहेत. येथे खालील सेवा निश्चित शुल्कात उपलब्ध आहेत:
- नवीन आधार नोंदणी
- नावात सुधारणा / बदल
- पत्ता अद्ययावत करणे (Address Update)
- जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक नोंदणी/बदल
- ई-मेल आयडी अद्ययावत करणे
- बायोमेट्रिक अद्यावतीकरण (Biometric Update)
रत्नागिरी जिल्ह्यातील आधार सेवा उपलब्ध असलेली प्रमुख पोस्ट ऑफिस:
- रत्नागिरी प्रधान डाकघर (Head Post Office)
- रत्नागिरी शहरातील सर्व पोस्ट ऑफिस
- शिवाजीनगर, रत्नागिरी
- एमआयडीसी, रत्नागिरी
- रत्नागिरी कलेक्टोरेट (Collectorate)
- पोस्ट ऑफिस खालगाव (जाकादेवी)
- पाली पोस्ट ऑफिस
- सैतवडे पोस्ट ऑफिस
- संगमेश्वर पोस्ट ऑफिस
- राजापूर मुख्य डाकघर
- देवरूख मुख्य डाकघर
- लांजा पोस्ट ऑफिस
- साखरपा पोस्ट ऑफिस
- पाचल पोस्ट ऑफिस
- कसबा पोस्ट ऑफिस
- ओणी पोस्ट ऑफिस
- कोंडये (राजापूर) पोस्ट ऑफिस
विश्वासार्ह, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख सेवा देणे हे टपाल विभागाचे ध्येय असून, नागरिकांनी जवळच्या पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी सर्व नागरिकांना केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 12-08-2026














