महिला सक्षमीकरणावर देणार भर
रत्नागिरी:
कोकण धनगर समाजोन्नती मंडळाच्या रत्नागिरी जिल्हा महिला समितीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या वैशाली रवींद्र गोरे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.
मंडळाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते सुरेश कोकरे यांच्या हस्ते सौ. वैशाली गोरे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
महिला सक्षमीकरण अन् संघटन मजबुतीवर भर
सामाजिक क्षेत्रातील वैशाली गोरे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि कार्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून समाजाला मोठा लाभ होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात महिला सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती, शैक्षणिक प्रबोधन आणि समाजहिताचे विविध उपक्रम राबवले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच समाजातील महिलांना संघटित करणे, त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे, महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे आणि त्यांना सामाजिक व शैक्षणिक कार्यात अधिकाधिक सहभागी करून घेणे, या मुख्य उद्देशाने महिला समितीच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 12-08-2026














