आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून चालना; पं. स. सदस्या मेघा इंगवले यांच्या हस्ते भूमिपूजन
चिपळूण:
तालुक्यातील दळवटणे मोहल्ला येथील कब्रस्तान सुशोभीकरणाच्या कामासाठी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक योजनेअंतर्गत विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामाचा नुकताच शुभारंभ झाला असून, पंचायत समिती सदस्या मेघा योगेश इंगवले यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.
नागरिकांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण
मंजूर निधीतून कब्रस्तान परिसरात आवश्यक मूलभूत सुविधा तसेच सुशोभीकरणाची विविध कामे केली जाणार आहेत. या विकासकामामुळे दळवटणे मोहल्ल्यातील मुस्लीम समाजाची आणि स्थानिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून, ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून चिपळूण विधानसभा मतदारसंघातील सर्व समाजघटकांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यापूर्वी दळवटणे मोहल्ल्यातील कब्रस्तान व रस्त्याच्या कामांसाठी निधी देण्यात आला होता, आणि आता सुशोभीकरणासाठी अधिकचा निधी मंजूर झाल्याचे पं. स. सदस्या मेघा इंगवले यांनी सांगितले.
प्रमुख उपस्थिती
या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी:
- संजय जाधव
- गुलामहुसैन चिपळूणकर
- अब्दुलमजीद कडवेकर
- दिलदार भेलेकर
- इरफान भेलेकर
- शरीफ कडवेकर
- अमान चिपळूणकर
- अहमद तळवलकर
- प्रदीप निकम
- प्रीतम गमरे
- अस्मिता घाडगेयांच्यासह परिसरातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 12-08-2026














