पार्थ आग्रे इयत्ता ७ वीत जिल्ह्यात प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांचा दामले विद्यालयात विशेष गौरव
रत्नागिरी:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ च्या निकालात रत्नागिरी शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील तब्बल २० विद्यार्थ्यांनी शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत चमकदार स्थान मिळवून रत्नागिरी शहराचे नाव राज्य व जिल्हास्तरावर उज्ज्वल केले आहे.
विशेष म्हणजे, शाळेचा विद्यार्थी पार्थ आग्रे याने २७० गुणांसह इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात प्रथम (Rank 1) येण्याचा बहुमान मिळवला आहे.
गुणवत्ता यादीत चमकलेले गुणवंत विद्यार्थी
इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती (शहरी गुणवत्ता यादी):
- युवराज ओलेकर: जिल्ह्यात २ रा (२७० गुण)
- श्रीवल्लभ कुलकर्णी: जिल्ह्यात १० वा (२५२ गुण)
- माहिरा सय्यद: जिल्ह्यात २२ वी (२४० गुण)
- आराध्या कोकरे: जिल्ह्यात ४७ वी (२२६ गुण)
- ईरा भावे: जिल्ह्यात ६२ वी (२१८ गुण)
- श्वेत पांचाळ: जिल्ह्यात ७२ वा (२१६ गुण)
- स्वानंदी धुळप: जिल्ह्यात ७५ वी (२१४ गुण)
- अर्णव करडे: जिल्ह्यात ९१ वा (२०८ गुण)
- भूमी भवतले: जिल्ह्यात ९६ वी (२०४ गुण)
- प्रेम कोकरे: जिल्ह्यात १०० वा (२०२ गुण)
- श्रीशा कोतवडेकर: जिल्ह्यात ११० वी (२०२ गुण)
(मार्गदर्शक शिक्षक: सौ. गौरी रजपूत, सौ. सारिका गोरे, श्री. प्रफुल्ल मयेकर, श्री. प्रवीण पाचलकर)
इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती (शहरी गुणवत्ता यादी):
- पार्थ आग्रे: जिल्ह्यात १ ला (२७० गुण)
- आर्या शिंदे: जिल्ह्यात ४ थी (२६४ गुण)
- आभा लोगडे: जिल्ह्यात ६ वी (२६२ गुण)
- आदित्य वाघचवरे: जिल्ह्यात ९ वा (२५४ गुण)
- अक्षाली सांबरे: जिल्ह्यात ३० वी (२२६ गुण)
- अद्वैता देसाई: जिल्ह्यात ५१ वी (२१६ गुण)
- स्वरा सुवरे: जिल्ह्यात ५२ वी (२१४ गुण)
- आराध्या कामतेकर: जिल्ह्यात ७६ वी (२०६ गुण)
- उत्कर्षा माळी: जिल्ह्यात ८१ वी (२०४ गुण)
(मार्गदर्शक शिक्षक: सौ. जुलेखा काझी, सौ. उज्ज्वला साळुंखे, सौ. सिद्धी विचारे, सौ. श्रद्धा गांगण, श्री. योगेश कदम, श्री. अक्षय जोगळेकर, श्रीम. ज्योती डंबाळे)
गुणवंतांचा विद्यालयात भव्य सत्कार
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा डाएट (DIET) रत्नागिरीचे प्राचार्य श्री. सुशील शिवलकर, नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी प्रा. श्री. सुधाकर मुरकुटे आणि मुख्याध्यापक श्री. भगवान मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत दामले विद्यालयात विशेष सत्कार करण्यात आला.
या घवघवीत यशाबद्दल माजी नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष तथा शिक्षण सभापती, श्री. समीर तिवरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद संसारे, मुख्याध्यापक भगवान मोटे व सर्व शिक्षकांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 12-08-2026














