कपिल सिब्बल यांच्या जोरदार युक्तिवादामुळे खंडपीठाचे समाधान; पक्षाचे नाव आणि चिन्ह आम्हालाच मिळणार, खासदार संजय राऊत यांचा दावा
Sanjay Raut Supreme Court Shiv Sena Case Reaction संदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय वाद पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) शिवसेना पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सलग पाचव्या दिवशी जोरदार युक्तिवाद केला. या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोग (ECI) आणि सत्ताधारी पक्षावर अतिशय तीक्ष्ण शब्दांत हल्लाबोल केला.
निवडणूक आयोगाने चूक केली. आयोगाने चुकीच्या आधारावर निर्णय घेतला, असं सिब्बल यांनी न्यायालयाला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रतही न्यायालयात सादर केली. दरम्यान, आजच्या जोरदार युक्तिवादानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. निवडणूक आयोगाने शेण खाल्लं असा हल्लाबोल राऊतांनी केला.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
आजचा युक्तिवाद हा निवडणूक आयोगाच्या प्रत्येक बेकायदेशीर कृत्याबाबत होता. देशातील आयोगाने निष्पक्षपणे काम करण्याची जबाबदारी संविधानानुसार घेतली आहे. त्या आयोगाने शिवसेनेबाबतीत पक्षपाती निर्णय घेतले. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे खंडपीठाचं समाधान झालं, असं मला वाटतं. आमच्यावर अन्याय झालाय, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली
तसेच, निवडणूक आयोगाने शेण खाल आहे. हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. देशाच्या संविधानावर हात ठेवून हा भ्रष्टाचार करण्यात आला, असा गंभीर आरोपही यावेळी राऊतांनी केला. निवडणूक आयोगाने बेकायदेशीर मार्ग तयार केला. त्या मार्गाच्या आधारे निर्णय घेण्यात आला आणि बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली. त्यांनाही चिन्ह देण्यात आले, असाही दावा त्यांनी केला.
अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत आयोगाने…
निवडणूक आयोगाने निर्णय आधीच ठरला होता. फार मोठे षड्यंत्र रचले गेले. निकाल आधी ठरला आणि नंतर हे लोक गुवाहाटीला गेले. पक्षफुटीचा आणि अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत आयोगाने निर्णय घेणे अपेक्षित नव्हते. ED आणि CBI वापरून आमदारानं कसे वळवले गेले, यावर सिब्बल यांनी युक्तिवाद केला, अशी माहिती राऊतांनी दिली.
निवडणूक आयोग हा भाजपचा एजंट
जिथे धर्म तिथे जय, असे सुप्रीम कोर्टाच्या शिरोभागी लिहिले आहे. निवडणूक आयोग हा भाजपचा एजंट आहे. मुळात पक्ष आणि चिन्हाचा निर्णय लागेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मंगळवारी देखील आमचाच युक्तिवाद होईल अशी माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:47 13-08-2026













