सामाजिक बांधिलकीतून दुर्ग संवर्धनाला हातभार
राजापूर :
Ambolgad Fort Cleanliness Drive अंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवणाऱ्या ‘जैतापूरचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने राजापूर तालुक्यातील दुर्लक्षित ऐतिहासिक आंबोळगड किल्ल्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व श्रमदान करत अवघ्या तीन तासांत किल्ल्याचा बहुतांश परिसर स्वच्छ करून किल्ले संवर्धनाच्या कार्याला मोठा हातभार लावला आहे.
रान, झुडपे आणि पालापाचोळा काढून किल्ला केला चकाचक
किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर वाढलेले रान आणि रानटी झुडपे कापून काढण्यात आली, तसेच साचलेला सर्व पालापाचोळा एकत्र करून परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने मंडळाने हा उपक्रम हाती घेतला होता.
मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या स्वच्छता मोहिमेत ‘जैतापूरचा राजा’ मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, सचिव राकेश दांडेकर, उपाध्यक्ष श्रीकृष्ण राऊत, खजिनदार सुनील करगुटकर आणि सहसचिव प्रसाद मांजरेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
याशिवाय परेरा भाटकर, सुहास पवार, बाबुली पेडणेकर, संदीप चव्हाण, गजानन करमळकर, महेश नारकर, स्वप्निल सोगम, पिंट्या पालकर, प्रियंका नार्वेकर, प्रकाश नार्वेकर, विश्वास करगुटकर, धनेश्वर खाडये, अशोक आंबोळकर व जितेंद्र भोहीर यांनी सक्रिय सहभाग नोंदवून ही मोहीम यशस्वी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:18 14-08-2026














