Hativale Toll Plaza Operations: हातिवले टोलनाका कार्यान्वित होण्याच्या हालचाली सुरू; स्थानिकांना संपूर्ण टोलमाफी देण्याची मागणी

महिनाअखेरीस टोलनाका सुरू होण्याची शक्यता; टोलमाफी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

राजापूर:

Hativale Toll Plaza Operations संदर्भात मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोलनाका पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील महिनाअखेरीस हा टोलनाका सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या टोलनाक्यावर तालुक्यातील स्थानिक नागरिकांसह स्थानिक वाहतूकदारांना संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी दिला आहे. त्यामुळे या टोलनाक्यावरून पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

पाच वर्षांपूर्वीच्या ठिय्या आंदोलनानंतर टोलनाका होता ठप्प

हातिवले येथील टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावी, या मागणीसाठी ५ वर्षांपूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी महामार्गावर मोठे ठिय्या आंदोलन छेडले होते. त्यानंतर हा टोलनाका बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील महामार्गावरील टोलनाका सुरू झाला असून, आता हातिवले टोलनाकाही महिनाअखेरीस कार्यान्वित करण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत.

दैनंदिन ये-जा करणाऱ्या वाहनधारकांवर आर्थिक भार

राजापूर शहरामध्ये विविध कामांनिमित्त स्थानिक नागरिकांना आणि वाहनधारकांना दिवसातून चार ते पाच वेळा ये-जा करावी लागते. अशा वेळी प्रत्येक फेरीला टोल भरणे स्थानिकांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नाही. यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाला या संदर्भात अनेक निवेदने देण्यात आली असली तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

Hativale Toll Plaza Operations मुळे स्थानिकांमध्ये असंतोष

स्थानिक वाहनांना टोलमाफी देण्याची जोरदार मागणी

राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्थानिक वाहनांचा विचार करून त्यांना टोलमधून पूर्ण सूट द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांकडून वारंवार केली जात आहे. कोणताही निर्णय न घेता जबरदस्तीने टोलनाका सुरू केल्यास स्थानिकांचा रोष ओढवला जाण्याची शक्यता लांजेकर यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 20-08-2026