संगमेश्वर : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामासाठी अनेक झाडे तोडण्यात आली आहेत. संगमेश्वर पट्टयातील काही झाडे परवानगी घेतलेली आहेत की नाही याबाबत शंकाच आहे. रस्त्याच्या लगतची अनेक झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे सावली गायब झाली आहे; मात्र रस्त्याच्या दुतर्फा नव्याने झाडे लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची हालचाली दिसून येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. महामार्गाचे काम गेले १२ वर्षे रखडले आहे.
काम सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी कामे झाडे तोडण्यात आली आहेत, तर काही झाडे बिनधास्तपणे तोडली जात आहेत. पक्ष्यांची निवासस्थाने असलेल्या झाडांना रात्रीच्या सुमारास तोडण्यात आली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेले जुनाट वृक्ष तोडण्यात आलेले आहेत. प्रवाशांना सावली देणारे वृक्ष अचानक तोडण्यात आल्याने सर्व ठिकाणी रखरखाट पसरलेला आहे. एप्रिल व मे महिन्यातील वाढलेल्या उष्णतेची सर्वाधिक झळ मार्गावरून प्रवास करणारे वाहने व त्यातील प्रवाशांना बसत आहे. झाडांचे अस्तित्वच कायमस्वरूपी संपुष्टात आल्याने त्याचा सर्वाधिक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे; मात्र असे असताना यंत्रणेकडून अद्याप कोणत्याही प्रकारच्या हालचाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहेत. त्यामुळे सावलीची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
महामार्गाचे काम रखडलेले असले तरीही रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे आवश्यक आहे. त्यासाठी ठेकेदारांनी तत्काळ कार्यवाही केली पाहिजे. तसे झाले नाही तर प्रवाशांना सावली मिळणार नाही. संतोष थेराडे, संगमेश्वर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:32 PM 07/Nov/2024