रत्नागिरीतील नागरिकांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन; हेल्पलाइन क्रमांक जाहीर
रत्नागिरी :
नेपाळमधील भीषण महापुरामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, अनेक पर्यटक आणि नागरिक तेथे अडकले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्यास, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी किंवा नातेवाईकांनी याची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी केले आहे.
लिंकवर सविस्तर माहिती भरण्याचे आवाहन
अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक ती मदत तात्काळ पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांनी https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ या अधिकृत लिंकवर जाऊन अडकलेल्या व्यक्तींची सविस्तर माहिती भरावी.
जिल्हा नियंत्रण कक्षाशी साधा संपर्क
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या मदतीसाठी संपर्क क्रमांकही जाहीर केले आहेत. अधिक माहिती किंवा आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
- फोन क्रमांक: 02352-222233
- मोबाईल क्रमांक: 7057222233
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:56 27-08-2026













