Guhagar Protection Wall Bhoomi Pujan: गुहागर वरचापाट येथे संरक्षण भिंतीच्या कामांचे भूमिपूजन

वरचापाट परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण

गुहागर :

गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील वरचापाट भागात नागरी सुविधांचा विस्तार करताना दोन महत्त्वाच्या संरक्षण भिंतींच्या उभारणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. ‘करण मोरे घर ते सुहास कचरेकर घर’ आणि ‘तोडणकर घर ते सचिन साखरकर घर’ या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतींच्या कामांचे भूमिपूजन गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष नीता मालप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात पार पडले.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

या भूमिपूजन सोहळ्याला गुहागर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडळ, बांधकाम सभापती उमेश भोसले, स्वच्छता व आरोग्य सभापती सुजित साटले, मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, नगरसेवक संतोष सांगळे, नगरसेविका मीरा घाडे, सुष्मा रहाटे, विशाखा सोमण, कोमल जांभळी आणि स्मिता जांगळी उपस्थित होते.

तसेच प्रशासकीय व राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये अभियंता आशिष खांबे, नगर अभियंता विजय भूतल, भाजप तालुका महिला अध्यक्ष प्रांजल कचरेकर, ठेकेदार ओम वेल्हाळ यांच्यासह श्री नर नारायण मंडळाचे अध्यक्ष मयुरेश साखरकर, निलेश मोरे, मोरेश्वर भोसले, पद्माकर भोसले, मनीष मोरे, संगम मोरे, मंदार मोरे, संजय भोसले, शैलेश भोसले, प्रशांत कचरेकर, मंदार कचरेकर, मैथली भोसले, अनघा कचरेकर, सायली तोडणकर, शिवानी तोडणकर आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांकडून नगरपंचायत प्रशासनाचा सत्कार

भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर गुहागर वरचापाट येथील प्रसिद्ध श्री नर नारायण मंदिर येथे ग्रामस्थांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विकासकामांना मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याबद्दल नगराध्यक्ष नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडळ, मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, उपस्थित सर्व नगरसेवक, तसेच अभियंता आशिष खांबे व नगर अभियंता विजय भूतल यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर उपस्थितांचे आणि सर्व मान्यवरांचे आभार बांधकाम समिती सभापती उमेश भोसले यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:39 27-08-2026