आर्थिक वादातून घडला प्रकार; अॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल, आरोपी फरार
Kondivare Caste Abuse Case News मुळे संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील कोंडीवरे येथील जिल्हा परिषद शाळेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेला आर्थिक वादातून शिवीगाळ आणि दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी मुजीब शौकत माद्रे याच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा (अॅट्रॉसिटी) व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला व आरोपी यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद सुरू होता. याच वादातून ४ सप्टेंबर रोजी आरोपीने पीडित महिलेला शिवीगाळ केली. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी पुन्हा वाद उफाळून आला असता, आरोपीने शिवीगाळ करत पीडित महिलेच्या दिशेने दगडफेक केली.
Kondivare Caste Abuse Case News Investigation : माखजन दूरक्षेत्रात तक्रार; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित महिलेने तातडीने माखजन पोलीस दूरक्षेत्रात जाऊन आपबिती सांगत तक्रार नोंदवली.
- विविध कलमांतर्गत गुन्हा: पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी मुजीब शौकत माद्रे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मधील कलम ३(१)(आर)(एस) नुसार, तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
- आरोपीचा शोध सुरू: घटना घडल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:38 10-09-2026














