रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहने उभी केल्याने पोलिसांची दंडात्मक कारवाई
Ratnagiri Traffic Obstruction Case News मुळे रत्नागिरी शहरातील बेकायदेशीर व धोकादायक पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील गजबजलेल्या मारुती मंदिर परिसरात इतर वाहनांच्या रहदारीला अडथळा आणि धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या दोन कारचालकांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ७:४० ते रात्री ८:१५ या कालावधीत मारुती मंदिर चौक परिसरात पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेदरम्यान करण्यात आली.
Ratnagiri Traffic Obstruction Case News : आरोपी व वाहनांचा तपशील
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या खालील दोन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे:
- सिद्धेश कृष्णकांत चव्हाण (रा. विनम्रनगर गोडाऊन, नाचणे, रत्नागिरी) – याने आपल्या ताब्यातील इनोव्हा कार (MH-08-AG-1538) रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभी केली होती.
- कुंतल मोहन खातू (वय ३९, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) – याने आपल्या ताब्यातील कार (MH-08-BE-6780) सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरेल अशा पद्धतीने उभी करून ठेवली होती.
या दोन्ही वाहनचालकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अधिनियम २०२३ च्या कलम २८५ प्रमाणे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्त्यांवर गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडी किंवा अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी ही धडक मोहीम सुरू केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 10-09-2026














