खेड : ज्ञानदीप भडगावच्या आशिक जानकर याची नौदलामध्ये निवड

खेड : ज्ञानदीप संस्थेच्या ज्ञानदीप विद्या संकुलात नर्सरी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव उच्च माध्यमिक विभागातील बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी आशिक जानकर याची भारतीय नौदलात निवड झाली आहे. संस्था व प्रशालेतर्फे त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.

अशिकला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. अनेक खेळांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले आहे. शालेय स्तरावर खेळतांना महाराष्ट्र राज्याच्या नेटबॉल संघामध्ये आशिकची निवड झाली होती. तेथील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली तेथेही आशिकने अतिशय उत्तम कामगिरी करत महाराष्ट्र राज्याच्या नेटबॉल संघाचे नाव उज्ज्वल केले.

या यशासह शालेय स्तरावरील स्काऊट राष्ट्रपती पुरस्कार चाचणी परीक्षाही अशिकने उत्तमरित्या दिली आहे आशिकच्या या उज्ज्वल यशाबद्दल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लढढा, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिंदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 08/Nov/2024