Dabhol Suspicious Activity Case: दाभोळ एसटी स्टँड परिसरातील टपरीमागे लपलेल्या तरुणावर गुन्हा

Dabhol Suspicious Activity Case: दाभोळ एसटी स्टँड परिसरातील टपरीमागे लपलेल्या तरुणावर गुन्हा

चोरीच्या उद्देशाने लपल्याचा संशय; उत्तर प्रदेशातील तरुणावर कायदेशीर कारवाई

दाभोळ एसटी स्टँड परिसरातील एका टपरीच्या मागे रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या लपून बसलेल्या तरुणाविरुद्ध दाभोळ सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरीच्या उद्देशाने स्वतःचे अस्तित्व लपवून तो तेथे थांबला असल्याचा संशय आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

राजेशकुमार योगेंद्र प्रसाद गौतम (वय २३, रा. फूलवारीया, ता. गोपालपूर, जि. संत कबीर नगर, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना २० सप्टेंबर रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास दाभोळ एसटी स्टँड येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, आरोपी गौतम हा सूर्यास्त ते सूर्योदयाच्या कालावधीत दाभोळ एसटी स्टँड येथील एका टपरीच्या मागे संशयितरीत्या लपून बसलेला पोलिसांना आढळला.

त्याचा वावर संशयास्पद वाटल्याने गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस व चौकशी केली. त्याला तेथे थांबण्याचे कारण विचारले तसेच नाव व गाव विचारण्यात आले, मात्र त्याने पोलिसांना समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. चोरीच्या उद्देशाने स्वतःचे अस्तित्व लपवून संशयास्पदरीत्या वावरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कारवाई केली.

Mahrashi karve ANM

याप्रकरणी पोलीस हवालदार दैवत दिलीप राणे यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यानुसार घटना घडल्यानंतर त्याच रात्री १०.५६ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, दाभोळ सागरी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.