Breaking : रत्नागिरीत टीआरपी येथे भीषण अपघात! रस्ते बांधणीच्या ‘ग्लॅडर’ यंत्राच्या चाकाखाली सापडून सायकलस्वाराचा जागीच मृत्यू

Breaking : रत्नागिरीत टीआरपी येथे भीषण अपघात! रस्ते बांधणीच्या ‘ग्लॅडर’ यंत्राच्या चाकाखाली सापडून सायकलस्वाराचा जागीच मृत्यू

साई हॉस्पिटलसमोर घडला दुर्दैवी प्रकार; अंगावरून चाक गेल्याने सायकलस्वार जागीच ठार, मृत व्यक्तीची ओळख अद्याप अस्पष्ट

रत्नागिरी :
रत्नागिरी शहरातून कुवारबावकडे जाणाऱ्या मार्गावर टीआरपी (TRP) येथील साई हॉस्पिटलसमोर काही वेळापूर्वीच एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड ‘ग्रेडर’ (Grader) यंत्राच्या चाकाखाली आल्याने एका सायकलस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

अंगावरून ग्रेडरचे चाक गेल्याने सायकलस्वार जागीच ठार :
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी शहरातून कुवारबावकडे जाणाऱ्या रस्त्यावर टीआरपी येथील साई हॉस्पिटलसमोरून रस्ते बांधणीसाठी वापरण्यात येणारे भव्य ‘ग्रेडर’ यंत्र जात होते. यावेळी तेथून जाणारा एक सायकलस्वार या ग्रेडरच्या चाकाखाली सापडला. या अवजड यंत्राचे चाक थेट सायकलस्वाराच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

मृत सायकलस्वाराची ओळख अद्याप पटलेली नाही; पोलीस घटनास्थळी दाखल :
या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वाराची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस त्याची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. सायंकाळच्या सुमारास मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात घडल्याने टीआरपी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली असून वाहतुकीवरही काहीसा परिणाम झाला आहे.

Shanti2