राजापुरात शिक्षकाचे घर फोडले; साडेसहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

राजापुरात शिक्षकाचे घर फोडले; साडेसहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

पाचल विद्यानगर येथील घटना; राजापूर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

राजापूर : राजापूर तालुक्यातील पाचल विद्यानगर येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ६ लाख ५० हजार १८५ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पळवून नेल्याची मोठी घरफोडी उघडकीस आली आहे. या प्रकरणी तुळसवडे हायस्कूलच्या शिक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुसाअल्ली गुलाब पिरजादे (वय ५६ वर्षे, व्यवसाय- शिक्षक तुळसवडे हायस्कूल, रा. पाचल विद्यानगर, ता. राजापूर, मूळ गाव- नवे पारगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दिनांक १२ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला.

Physciobot

कपाटातील तिजोरी फोडून साडेसहा लाखांचा ऐवज लंपास :

चोरट्याने घरातील लाकडी आणि लोखंडी कपाटांचे दरवाजे उघडून तिजोरीतील दागिन्यांवर डल्ला मारला. यामध्ये २ लाख ७० हजार ७३५ रुपये किमतीचे साडेचार तोळ्यांचे सोन्याचे घंटण, १ लाख २ हजार ३३३ रुपयांचा १८.४७७ ग्रॅम वजनाचा कलर स्टोन्स सोन्याचा नेकलेस, ९८ हजार ५३ रुपयांचे एक तोळ्याचे सोन्याचे डायमंड मंगळसूत्र, ६० हजार ६७९ रुपयांचे कानातील डायमंडचे टॉप्स, ४९ हजार ४४८ रुपयांचा एक तोळ्याचा सोन्याचा ब्रेसलेट, ४३ हजार ८८४ रुपयांचे लहान सोन्याचे मंगळसूत्र, १० हजार २२० रुपयांचे दोन सोन्याचे टॉप्स व सोन्याचा हार, १ हजार ६६२ रुपयांच्या सोन्याच्या रिंगा, १ हजार १७१ रुपयांचा चांदीचा पैंजण जोड आणि १२ हजार रुपयांची रोकड (२०० रुपयांच्या ६० नोटा) असा एकूण ६ लाख ५० हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

राजापूर पोलिसांत गुन्हा दाखल :

घरी परतल्यानंतर कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आणि सोन्याचे दागिने गायब असल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तात्काळ राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. फिर्यादी मुसाअल्ली पिरजादे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३०५(क), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गु.र.नं. २५३/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याराजापूर तालुक्यातील पाचल विद्यानगर येथे शिक्षकाचे बंद घर फोडले; साडेसहा लाखांचे दागिने व रोकड लंपास