Dhamapur Ramanwadi Ganpatipule Scene: धामापूर रामणवाडीत साकारले ‘श्रीक्षेत्र गणपतीपुळे’!

Dhamapur Ramanwadi Ganpatipule Scene: धामापूर रामणवाडीत साकारले 'श्रीक्षेत्र गणपतीपुळे'!

अथांग समुद्र, वाळूत शिवलिंग साकारणारा ‘बाल गणेश’ आणि प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिराची हुबेहूब प्रतिकृती ठरतेय कौतुकाचा विषय

धामापूर रामणवाडी गणपतीपुळे देखावा सध्या संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात आणि विशेषतः कडवई पंचक्रोशीत मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर येथील रामणवाडीमध्ये राहणारे तरुण गणेशभक्त रोशन रामाणे यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवात ‘श्रीक्षेत्र गणपतीपुळे’ येथील अतिशय नयनरम्य देखावा साकारला आहे. हा आकर्षक देखावा सध्या भाविकांच्या विशेष पसंतीस उतरत असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

या देखाव्यात अथांग पसरलेला निळाशार समुद्र, किनाऱ्यावर खेळणारी लहान मुले, पर्यटनाचा आनंद घेणारे भाविक आणि समुद्राच्या वाळूत बसून शिवलिंग साकारणारी ‘बाल गणेशा’ची मोहक मूर्ती अत्यंत बारकाईने आणि कलात्मकतेने मांडण्यात आली आहे. बाप्पाच्या पाठीमागे दिसणारी हिरवीगार टेकडी आणि हुबेहूब साकारलेले प्रसिद्ध श्रीक्षेत्र गणपतीपुळे मंदिर या संपूर्ण देखाव्याला जिवंत रूप देतात.

याशिवाय मूर्तीच्या भोवती खेळणारे मूषक आणि समुद्रकिनाऱ्यावरील प्रसन्न निसर्गरम्य वातावरण यामुळे देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे. रोशन रामाणे यांनी कल्पकतेने तयार केलेला हा देखावा पाहण्यासाठी धामापूर परिसरासह आजूबाजूच्या गावांतील नागरिकांची आणि गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे.

Arihant 2