मतदार यादीतून १२ कोटींहून अधिक नावे वगळल्याचा दावा; एसआयआर (SIR) प्रक्रियेवरून निवडणूक आयोग आणि विरोधकांमध्ये जुंपली
Abhijeet Dipke Gyanesh Kumar SIR Controversy संदर्भात देशाच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि वादग्रस्त बातमी समोर येत आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका खळबळजनक अहवालानंतर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार थेट टीकेचे लक्ष्य बनले आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यानंतर आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अभिजीत दीपके यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावर पोस्ट करत थेट विधान केले की, "ज्ञानेश कुमार हे भारताचे शत्रू आहेत." अहवालाचा दाखला देत त्यांनी पुढे लिहिले की, विशेष सखोल पुनरावलोकनादरम्यान (SIR) मतदार यादीतून तब्बल १२ कोटींहून अधिक नावे वगळण्यात आली आहेत. हे प्रमाण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नोंदणीकृत असलेल्या ९७ कोटी मतदारांच्या अंदाजे १२.४ टक्के इतके प्रचंड आहे.
‘ते निवडणुका घेत नाहीत, तर स्क्रिप्ट लिहित आहेत’:

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी पक्षांमधील मतांचा फरक केवळ २ टक्के असल्याचे सांगत दीपके यांनी गंभीर आरोप केला. "मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार निष्पक्ष निवडणुका घेत नसून, ते एका विशिष्ट पक्षासाठी निवडणुकीची पटकथा (स्क्रिप्ट) लिहित आहेत," असा टोला त्यांनी लगावला. दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’ (SIR) ला ‘विशेष सखोल हेराफेरी’ असे संबोधले. यापूर्वी सीजेपी नेते आशुतोष रांका यांनीही, "जेव्हा या देशाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा लोकशाहीचा घात करणाऱ्यांच्या यादीत ज्ञानेश कुमार यांचे नाव अग्रस्थानी असेल," अशी घणाघाती टीका केली होती.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण व अंतर्गत मतभेद:
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयआरसह सर्व निर्णय हे सर्वानुमते आणि मुख्य निवडणूक आयुक्तांसह दोन्ही निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेनेच घेण्यात आले आहेत. मात्र, इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआर प्रक्रियेतील अनेक मुद्द्यांवर गंभीर आक्षेप नोंदवले होते. त्यांनी तब्बल १० महिन्यांत १४ वेळा आक्षेप दाखल केले होते, परंतु त्यांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.













