रत्नागिरीतील दोन्ही ‘राजांना’ उद्या निरोप

रत्नागिरी : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होत असून मंगळवारी 65 सार्वजनिक तर 37 हजारहून अधिक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी बाराव्या दिवशी 12 सार्वजनिक गणरायांना निरोप देण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरीतील मानाचा श्री रत्नागिरीचा राजा मारुती मंदिर, आठवडा बाजार येथील रत्नागिरीचा राजा आणि जयगड येथील जयगडचा राजा या प्रमुख तीन गणपतींचा समावेश आहे. मंडळांच्या वतीने मिरवणुकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. ढोल-ताशा पथकांसह डीजेवरही ताल धरता येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 17-09-2024