Shree Durga Mata Daud Ratnagiri: रत्नागिरीत १५ व्या ‘श्री दुर्गामाता दौड २०२६’ चे आयोजन

Shree Durga Mata Daud Ratnagiri: रत्नागिरीत १५ व्या 'श्री दुर्गामाता दौड २०२६' चे आयोजन

११ ते २० ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी मारुती मंदिर येथून निघणार दौड

Shree Durga Mata Daud Ratnagiri: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी यांच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘श्री दुर्गामाता दौड २०२६’ या सांस्कृतिक, धार्मिक आणि राष्ट्रभक्तीपर उपक्रमाचे यंदा १५ वे वर्ष आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रत्नागिरी शहरात ही दौड अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. दररोज सकाळी मारुती मंदिर सर्कल (शिवतीर्थ) येथून ही दौड निघणार असून, यामध्ये रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

*Shree Durga Mata Daud Ratnagiri: तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती अन् शिस्त रुजवण्याचा प्रयत्न*
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून व श्री तुळजाभवानीच्या आशीर्वादाने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. श्री दुर्गामाता दौड हा केवळ धावण्याचा उपक्रम नसून, देव, देश आणि धर्मरक्षणासह राष्ट्र, संस्कृती आणि स्वाभिमानाच्या विचारांना जागृत करणारा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये देशभक्ती, राष्ट्राभिमान, धर्म व संस्कृतीविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच शिस्त, संघटन आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

*११ ते २० ऑक्टोबरदरम्यानचा दौड मार्ग आणि सहभागी मंडळे*
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, १० दिवस चालणाऱ्या या दौडीचा मार्ग आणि सहभागी नवरात्र मंडळे खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहेत:

Radhakrushna patapedhi

११ ऑक्टोबर: मारुती मंदिर ते माळनाका, के.सी. जैन नगर, एकता मार्ग आणि पुन्हा मारुती मंदिर. (सहभाग: श्री व्याघ्रेश्वरी अंबा माता मंदिर नवरात्र मंडळ).

१२ ऑक्टोबर: मारुती मंदिर ते मजगाव रोड, चर्मालय, क्रांतिनगर, कोकणनगर, चर्मालय मार्गे मारुती मंदिर. (सहभाग: महापुरुष मित्र मंडळ व क्रांतिनगर नवरात्र उत्सव मंडळ).

१३ ऑक्टोबर: मारुती मंदिर ते माळनाका, मेटल हॉस्पिटल रोड, जेल रोड, माळनाका ते मारुती मंदिर. (सहभाग: महापुरुष बाल मित्रमंडळ व पोलीस महापुरुष तरुण मित्रमंडळ).

१४ ऑक्टोबर: मारुती मंदिर ते दामले शाळा रोड, पॉवर हाऊस, विश्वनगर, पॉलिटेक्निकल रोड ते मारुती मंदिर. (सहभाग: विश्वनगर मित्रमंडळ).

१५ ऑक्टोबर: मारुती मंदिर ते माळनाका, सन्मित्रनगर, तारांगण रोड, माळनाका ते मारुती मंदिर. (सहभाग: आई माऊली मित्रमंडळ व सन्मित्रनगर कार्यकर्ते).

१६ ऑक्टोबर: मारुती मंदिर ते माळनाका, हिंदू कॉलनी रोड, थिबा पॅलेस रोड, हिंदू कॉलनी रोड ते मारुती मंदिर. (सहभाग: थिबा पॅलेस रोड मित्र मंडळ).

१७ ऑक्टोबर: मारुती मंदिर ते अभ्युदयनगर, नाचणे रोड, साळवी स्टॉप, शिवाजीनगर ते मारुती मंदिर. (सहभाग: श्री नवलाई देवी मंदिर नवरात्र मंडळ).

१८ ऑक्टोबर (तेलीआळी नाका येथून सुरुवात): तेलीआळी नाका, पंचायती आळी, विठ्ठल मंदिर, चिटक आळी, गणपती मंदिर, जोगेश्वरी मंदिर, झाडगाव नाका, श्री देव भैरी सहाण, शेरनाका, लक्ष्मी चौक, मारुती आळी ते तेलीआळी नाका. (सहभाग: श्री जोगेश्वरी मंदिर नवरात्र मंडळ).

१९ ऑक्टोबर: तेलीआळी नाका ते मांडवी नाका, घुडेवघर, दत्त मंदिर ते तेलीआळी नाका. (सहभाग: जय भैरव नवरात्र मंडळ व तेलीआळी मंडळ).

२० ऑक्टोबर (विजयादशमी): मारुती मंदिर सर्कल येथून दुचाकीवरून वळण, मांडवी रोड, किल्ला व त्यानंतर दौड मार्गाने भगवती मंदिरापर्यंत. (सहभाग: श्री भगवती देवी मंदिर, किल्ला रत्नदुर्ग नवरात्र मंडळ).

*आयोजकांकडून रत्नागिरीकरांना सहभागाचे आवाहन*
रत्नागिरी शहरातील नागरिक, युवक, विविध नवरात्र मंडळे आणि शिवभक्तांनी हिंदू समाजाच्या संघटन आणि संस्कृती रक्षणासाठी या दौडीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरीतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी देवेंद्र झापडेकर (7020024242), गौरव सावंत (7057395969), अक्षत सावंत (9921116389) आणि जयदीप साळवी (9922429577) यांच्याशी संपर्क साधता येईल.