महिला व बालविकास मंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा; आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेण्याचे संघटनेचे आश्वासन
Anganwadi Workers Strike Postponed: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आणि विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत मंत्रालयात अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. या सकारात्मक बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने आज, मंगळवारी आयोजित केलेला एकदिवसीय लाक्षणिक संप आणि मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात येणारा मोर्चा मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे.
Anganwadi Workers Strike Postponed: मंत्रालयातील बैठकीत मागण्यांवर सकारात्मक चर्चा
या उच्चस्तरीय बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी व अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर निदर्शने करण्याबाबतचे निवेदन संघटनेतर्फे देण्यात आले होते. त्याअनुषंगाने सोमवारी मंत्री आदिती तटकरे यांनी तातडीने बैठक बोलावून कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. प्रशासनाने मानधनवाढ, सेवा-सुविधा व इतर मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने संघटनेने समाधान व्यक्त करत प्रस्तावित संप आणि मोर्चा मागे घेण्याचा निर्णय घेतला.
संप मागे घेतल्याने बालकांसह गरोदर महिलांना दिलासा
अंगणवाडी सेविका आणि मदतीस यांनी संप मागे घेतल्यामुळे राज्यातील कुपोषणमुक्ती कार्यक्रम, पूर्वप्राथमिक शिक्षण आणि गरोदर व स्तनदा मातांसाठी राबवल्या जाणाऱ्या पोषण योजना सुरळीत सुरू राहणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:34 06-10-2026














