Ratnagiri News: मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामात कसूर; संगमेश्वरमधील शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस

Ratnagiri News: मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामात कसूर; संगमेश्वरमधील शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस

BLO Duty Negligence प्रकरणी सह्याद्रीनगर येथील बीएलओची निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीच नाही; पोलीस दैनंदिन अहवालात नोंद

BLO Duty Negligence प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीनगर, झेपलेवाडी (पूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संदेश प्रकाश झेपले यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाची नोंद रत्नागिरी जिल्हा पोलीस दैनंदिन अहवालात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदेश झेपले यांची चिपळूण विधानसभा मतदारसंघातील २८३-साडवली मतदार यादी भागासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नियुक्ती आदेशानुसार त्यांनी हे कामकाज स्वीकारले नसल्याचे अहवालात नमूद आहे.

मतदार यादीच्या कामकाजासाठी भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याबाबत त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. संपर्क साधूनही त्यांनी नोंदणी केली नसल्याचे सांगण्यात आले असून, त्यामुळे सहायक मतदार नोंदणी अधिकारी, २६५ चिपळूण विधानसभा मतदारसंघ आणि प्रभारी तहसीलदार, संगमेश्वर यांच्याकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Arihant 2

BLO Duty Negligence: नोटीसीवर खुलासा नाही; दैनंदिन अहवालात नोंद
बजावण्यात आलेल्या नोटीसीवरही अद्याप खुलासा सादर केला नसल्याचे अहवालात नमूद आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी व महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

निवडणूक आयोगाचा कार्यक्रम: भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीचे काम ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक असते.

कर्तव्यात कसूर: या कामात टाळाटाळ करून शासकीय कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याने या प्रकरणाची पोलीस दैनंदिन अहवालात नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया प्रलंबित: या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित शिक्षकांची प्रतिक्रिया अद्याप उपलब्ध झालेली नाही.