Ratnagiri Cashew Processors Association : काजू उद्योगाला उभारी देण्यासाठी काजू प्रक्रियाधारक संघाची बैठक; शासनाकडे विविध मागण्यांचा प्रस्ताव

जिल्ह्यात काजू साठवणूक, तालुकास्तरीय गोदाम आणि माल तारण कर्ज योजनेची मागणी; संघाची नवी कार्यकारिणी जाहीर: अध्यक्षपदी विवेक बारगीर तर सचिवपदी दिनेश पवार

रत्नागिरी :

Ratnagiri Cashew Processors Association News अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील काजू प्रक्रियाधारक संघाची सर्वसाधारण बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह, रत्नागिरी येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत सध्या गंभीर अडचणीत सापडलेले काजू कारखानदार आणि काजू उत्पादक शेतकरी यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या समस्यांवर मात करण्यासाठी व उद्योग पुन्हा रुळावर आणण्यासाठी शासनाकडे सादर करावयाच्या विविध मागण्यांचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव या वेळी तयार करण्यात आला.

काजू उद्योगासाठी प्रस्तावातील प्रमुख मागण्या

१. स्थानिक काजू साठवणूक: रत्नागिरी जिल्ह्यात पिकणारा काजू जिल्ह्यामध्येच साठवला जावा, जेणेकरून जिल्ह्यातील सर्व कारखानदारांना वर्षातील किमान १० महिने कारखाने चालवणे शक्य होईल. २. CFC व गोदाम व्यवस्था: तालुकास्तरावर आधुनिक गोदामे आणि ‘सीएफसी’ (Common Facility Centre) व्यवस्थेची निर्मिती करणे. ३. ब्रँडिंग अन् विक्री: कोकणातील उच्च दर्जाच्या काजूगराचे ब्रँडिंग करून त्याच्या अधिकृत विक्रीसाठी व्यवस्था उभारणे. ४. माल तारण कर्ज योजना: काजू कारखानदार व शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी माल तारण कर्ज योजना लागू करणे.

Tata aeris

सदर मागणी प्रस्ताव महाराष्ट्र काजू बोर्ड आणि राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

रत्नागिरी जिल्हा काजू प्रक्रियाधारक संघाची नवी कार्यकारिणी

या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली:

  • अध्यक्ष: विवेक बारगीर
  • कार्याध्यक्ष: ओमकार कोलते
  • सचिव: दिनेश पवार
  • खजिनदार: मुकेश देसाई
  • शासकीय संपर्क प्रमुख: प्रताप पवार आणि जयवंत विचारे

तालुका निहाय संचालक:

  • राजापूर: निलेश खानविलकर, रमेश वाडकर, जयेश दळवी
  • लांजा: सचिन जाधव, संदेश पेडणेकर
  • संगमेश्वर: प्रकाश चाळके, स्वाती पवार, सुनीता पाटील
  • रत्नागिरी: संदेश दळवी, हैदर बरमारे, तौफिक खतिब
  • चिपळूण: अजय मोरे, शैलेश साप्ते
  • खेड: प्रणव शेठ, अनिल काटकर
  • गुहागर: संदेश मोरे, संजय गाडगिळ
  • दापोली: राजन साखळकर, प्रशांत पेठे
  • मंडणगड: गिरीश जोशी

लोकप्रतिनिधी अन् मंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा होणार

बैठकीस महाराष्ट्र काजू बोर्डाचे संचालक धनंजय यादव विशेष उपस्थित होते. लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातील काजू कारखानदार आणि शेतकऱ्यांचा भव्य मेळावा मंत्री, आमदार व शासकीय यंत्रणेच्या उपस्थितीत आयोजित करून थेट शासन दरबारी मागण्या मांडल्या जातील, अशी घोषणा नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक बारगीर यांनी केली.

तसेच, शासन दरबारी सतत पाठपुरावा करून अडचणीत आलेल्या काजू उद्योगाला पुन्हा नव्या जोमाने उभारी मिळवून दिली जाईल, असा विश्वास शासकीय संपर्क प्रमुख प्रताप पवार यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 07-10-2026