लाग्राही पदार्थांची वाहतूक करताना भरधाव वेगामुळे अपघात; नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याची फिर्याद
Gas Tanker Accident Ratnagiri तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत हातखंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उतारात सोमवारी (ता. २३) दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडला. ज्वालाग्राही पदार्थ वाहून नेणारा गॅस टँकर निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकरचालक जबराव रंगराव देशमुख (वय ४९, रा. कळंबेश्वर, ता. मेहकर, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित चालक जीओ गॅस कंपनीचा ज्वालाग्राही पदार्थाने भरलेला टँकर (क्र. एमएच ४३ वाय ५८१७) घेऊन निवळी ते कोल्हापूर असा प्रवास करत होता. प्रवासादरम्यान मुंबई-गोवा महामार्गालगत हातखंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उतारावरून जाताना चालकाने टँकर भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवल्याने हा अपघात झाला.
Gas Tanker Accident Ratnagiri: पोलीस पाटलांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद
टँकरमध्ये ज्वालाग्राही पदार्थ असल्याची पूर्ण माहिती असतानाही चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत हातखंबा येथील पोलीस पाटील शर्वरी सनगरे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित चालक जबराव देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, अपघाताच्या कारणांचा आणि पुढील कायदेशीर बाबींचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.













