शाळांमधील ई-सुविधा, स्वच्छता आणि गुणवत्तेची शिक्षणमंत्र्यांकडून होणार पाहणी
रत्नागिरी :
Dada Bhuse Ratnagiri School Inspection संदर्भात ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री दादा भुसे ८ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील तीन शाळांची अचानक पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात ते नगरपरिषद, जिल्हा परिषद किंवा खाजगी शाळांपैकी कोणत्याही तीन शाळांना भेट देऊन तेथील शैक्षणिक सोयी-सुविधांची प्रत्यक्ष तपासणी करणार आहेत. शिक्षणमंत्र्यांच्या या अचानक पाहणीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा अलर्ट मोडवर आल्या आहेत.
Dada Bhuse Ratnagiri School Inspection: भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेची होणार झाडाझडती
या भेटीदरम्यान शाळांमधील पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वर्गखोल्यांची दुरुस्ती, नवीन वर्गखोल्या, परिसराची स्वच्छता, क्रीडांगण, संरक्षक कुंपण, वीज, आवश्यक फर्निचर आणि ई-सुविधा यांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांची उपलब्धता आणि शैक्षणिक गुणवत्ता यावरही प्रत्यक्ष चर्चा केली जाणार आहे.
जिल्हा परिषद सभागृहात आढावा बैठक आणि नोडल अधिकाऱ्यांची पाहणी
‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, यापूर्वी जिल्ह्याचे नोडल अधिकारी महेश चोथे यांनी जिल्ह्यातील चार शाळांची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या होत्या. शाळांच्या पाहणीनंतर शिक्षणमंत्री भुसे दुपारी जिल्हा परिषद सभागृहात विशेष आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीस जिल्हाधिकारी, सीईओ, लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 08-10-2026














