Horoscope Today 8 October 2026: ८ ऑक्टोबर २०२६ चे राशीभविष्य; जाणून घ्या आजचा गुरुवार सर्व १२ राशींसाठी कसा राहील

Horoscope Today 23 September 2026: २३ सप्टेंबर २०२६ चे राशीभविष्य; जाणून घ्या सर्व १२ राशींसाठी कसा राहील आजचा बुधवार

Horoscope Today 8 October 2026 नुसार आज ८ ऑक्टोबर २०२६ रोजी गुरुवारचा दिवस आहे. गुरुवार हा श्री गुरुदेव दत्तांना समर्पित मानला जातो. ग्रहांच्या गोचर आणि विविध शुभ राजयोगांमुळे आजचा दिवस ग्रहांच्या हालचालींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या ग्रहांच्या संक्रमणाचा १२ राशींच्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे, याचे सविस्तर राशीभविष्य खालीलप्रमाणे आहे:

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. आज तुमच्यावर धनवर्षाव होण्याची दाट शक्यता आहे; मात्र त्याच वेळी खर्चात वाढ होईल. खाण्यापिण्याच्या वेळेची काळजी घ्या. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रॉपर्टीसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.

वृषभ रास (Taurus)

आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत लाभदायी ठरेल. नशिबाची पूर्ण साथ लाभेल आणि काही मोठे प्रोजेक्ट्स हाती येतील. आई-वडिलांचा आशीर्वाद पाठीशी राहील. व्यवसायात किंवा कामात जोडीदाराचा (पार्टनर) सहभाग मोलाचा ठरेल. एखादी महत्त्वाची माहिती आज हाती लागू शकते.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समस्यांतून मुक्ती देणारा ठरेल. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले वादाचे वादळ शमण्याची वेळ आली आहे. आजूबाजूच्या परिस्थितीत सकारात्मक बदल घडतील. व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करून काम कराल.

Infigo eyecare

कर्क रास (Cancer)

कर्क राशीसाठी आजचा दिवस सामान्य राहील. ना फार मोठा लाभ ना तोटा, अशी परिस्थिती असेल. त्यामुळे जास्त अपेक्षा न ठेवता आपले काम प्रामाणिकपणे करत राहा. विरोधकांपासून सावध राहणे गरजेचे आहे, कारण तुमची एक चूक भविष्यावर परिणाम करू शकते.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. मात्र, आज बोलण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कोणी दुखावले जाणार नाही. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेलच असे नाही, त्यामुळे स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीसाठी आजचा दिवस सावधगिरी बाळगण्याचा आहे. भूतकाळातील काही प्रसंग किंवा गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात. एखादी चूक घडली असल्यास आजच ती प्रामाणिकपणे कबूल करा. आज कोणताही नवीन प्रकल्प किंवा काम सुरू करणे टाळा.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळेल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल. दिवसभरात एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धैर्य आणि संयमाचा आहे. मनाविरुद्ध काही गोष्टी घडण्याची शक्यता असल्याने सावध राहा. कोणतीही मोठी जोखीम पत्करू नका किंवा घाईघाईत महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. घरगुती कामांमध्ये वेळ द्याल.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीसाठी आजचा दिवस व्यस्ततेचा आणि काळजी घेण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी मानसिक ताण वाढू शकतो, त्यामुळे तब्येतीची आणि वेळेवर झोपेची काळजी घ्या. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता असून एखादी आश्चर्यकारक घटना घडू शकते.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा राहील. एखाद्या कामाविषयी सतत चिंता सतावेल, ज्यामुळे एकाग्रता भंग होऊ शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी शेअर्स घसरण्याची शक्यता असल्याने जपून व्यवहार करा.

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीकारक ठरेल. नोकरदारांना पदोन्नती (Promotion) मिळण्याची शक्यता आहे. अडकलेली सरकारी कामे मार्गी लागतील आणि परदेश प्रवासाची संधी निर्माण होईल. जवळच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

मीन रास (Pisces)

मीन राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असेल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. संध्याकाळी धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील व वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 08-10-2026