दुपारी २ वाजता पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा
Sharan Kumar Limbale यांची शंभराव्या (१०० व्या) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, दुपारी दोन वाजता आयोजित पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
चर्चेतील नावांवर मात करत पसंती
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आतापर्यंत विविध नावे चर्चेत होती. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचे नाव आघाडीवर मानले जात होते. अखेर निवड समितीने त्यांच्या नावावर पसंती दर्शवली आणि शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.
दुपारी दोन वाजता अधिकृत घोषणा
पुण्यात पार पडलेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर आज दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असून, साहित्य वर्तुळात या निर्णयाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.














