रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षात ४ हजार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांची घसरण; २१ शाळांचे समायोजन
रत्नागिरी: ZP School Student Enrollment Decline Ratnagiri च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मराठी शाळांच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस खालावत चालली असून गेल्या अवघ्या एका वर्षात तब्बल ४ हजार ५२६ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शून्य पटसंख्येमुळे जिल्हा परिषदेच्या २१ शाळांना टाळे ठोकण्याची वेळ आली आहे.
ZP School Student Enrollment Decline Ratnagiri: इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या क्रेझमुळे मराठी शाळा ओस
ग्रामीण भागातील पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वेगाने वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या रोडावत चालली आहे. शून्य पटसंख्येमुळे अनेक शाळांमध्ये ‘शिक्षक आहेत पण विद्यार्थीच नाहीत’ अशी दुर्दैवी अवस्था निर्माण झाली होती. अखेर विद्यार्थ्यांअभावी या शाळांचे जवळच्या दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन करून २०२५-२६ मध्ये २१ शाळा अधिकृतपणे बंद करण्यात आल्या आहेत.
पटसंख्येअभावी ६ खासगी शाळांवरही संक्रांत
विद्यार्थीसंख्येतील या घसरणीचा फटका केवळ जिल्हा परिषदेच्या शाळांनाच नव्हे, तर खासगी शाळांनाही बसला आहे. २०२५-२६ या कालावधीत पटसंख्या न पुरल्याने जिल्ह्यातील ६ खासगी मराठी शाळा बंद कराव्या लागल्या आहेत.
२०२६-२७ च्या सत्रात बंद पडणाऱ्या शाळांचा आकडा आणखी वाढणार?
सध्या सुरु असलेल्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ज्या शाळांमध्ये शून्य पटसंख्या आहे, तेथील शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बंद पडणाऱ्या शाळांची खरी व नवी आकडेवारी समोर येणार आहे. यामुळे कोकणातील मराठी शाळांच्या भवितव्याबाबत शैक्षणिक व सामाजिक वर्तुळातून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 08-10-2026














