सांगलीतील विभागीय स्पर्धेत चमकदार कामगिरी
रत्नागिरी :
Om Terse Chess Selection अंतर्गत सांगली येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित शासकीय शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरीच्या ओम तेरसे या खेळाडूने चमकदार कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. ही स्पर्धा सांगलीतील श्रीमती कस्तुरीबाई वालचंद महाविद्यालयात पार पडली.
Om Terse Chess Selection: बिगरमानांकित असतानाही फिडे मानांकित खेळाडूंना दिली झुंज
१४ वर्षाखालील वयोगटातील मुलांच्या या स्पर्धेत एकूण ४० खेळाडू सहभागी झाले होते, ज्यापैकी २९ खेळाडू फिडे (FIDE) मानांकित होते. बिगरमानांकित असलेल्या ओमला शेवटचे म्हणजे ४० वे सिडिंग (Siding) मिळाले होते. तरीही त्याने पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत सर्व फिडे रेटेड खेळाडूंना तगडी झुंज देत ६ फेऱ्यांमध्ये ४.५ गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला.
बुद्धिबळातील प्रवास आणि प्रशिक्षण
मानेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या ओमचा बुद्धिबळातील प्रवास जुलै २०२४ मध्ये सुरू झाला.
सुरुवातीचा प्रवास: इंटरनेटवरील एका साईटवर अकाऊंट तयार करून कोणत्याही मदतीशिवाय युट्यूब व्हिडिओ आणि ऑनलाइन खेळाच्या माध्यमातून त्याने स्वयंअध्ययनाने बुद्धिबळ शिकण्यास सुरुवात केली.
शास्त्रीय प्रशिक्षण: त्याची आवड पाहून पालकांनी त्याला रत्नागिरीतील बुद्धिबळ प्रशिक्षक चैतन्य भिडे यांच्या ‘मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी’त प्रवेश मिळवून दिला, जिथे तो सध्या तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे.
नांदेड येथील राज्यस्तरीय स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व
अल्पवधीतच ओमने बुद्धिबळात केलेल्या या उल्लेखनीय प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता नांदेड येथे होणाऱ्या राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत ओम रत्नागिरी जिल्ह्याचे आणि कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 08-10-2026














