Ratnagiri Shil Kadamwadi Illegal Liquor Raid: शिळ कदमवाडीत नदीकाठच्या गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

करबुडे येथील एकावर गुन्हा, शहर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी: Ratnagiri Shil Kadamwadi Illegal Liquor Raid च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर पोलिसांनी बेकायदा दारूधंद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील मौजे शिळ, कदमवाडी येथील नदीकाठच्या झाडीझुडपात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर मंगळवारी सकाळी पोलिसांनी अचानक छापा टाकला. या धडक कारवाईत सुमारे १ लाख ९२ हजार २०० रुपये किमतीचे गूळ-नवसागरमिश्रित कुजके रसायन, तयार दारू आणि दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून, एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ratnagiri Shil Kadamwadi Illegal Liquor Raid: निर्जन जंगलमय भागात गुपचूप सुरू होती हातभट्टी

शिळ कदमवाडी परिसरातील नदीकाठच्या निर्जन व जंगलमय भागात अवैध गावठी दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना मिळाली होती. या बातमीच्या आधारे मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पोलीस पथकाने या ठिकाणी छापा टाकला. या वेळी करबुडे येथील संशयित आरोपी सुनील सुरेश आग्रे (वय ३८, रा. आग्रेवाडी, करबुडे, ता. जि. रत्नागिरी) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना हातभट्टीची दारू तयार करताना रंगेहाथ पकडला गेला.

२,९०० लिटर कुजके रसायन अन् दारू गाळण्याचे साहित्य जप्त

पोलिसांनी घटनास्थळावरून २०० लिटर क्षमतेच्या वेगवेगळ्या बॅरल्समध्ये साठवून ठेवलेले सुमारे २ हजार ९०० लिटरहून अधिक गूळ-नवसागरमिश्रित कुजके रसायन नष्ट केले. तसेच ४० लिटर तयार हातभट्टी दारू, दारू गाळण्यासाठी लागणारी ॲल्युमिनियमची डेग, लाकडी चाटू, पाईप आणि प्लॅस्टिकच्या कॅन्स असा एकूण १ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अमिता संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुनील आग्रे याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अवैध धंद्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, यादृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत.

Arihant 2

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 08-10-2026