Chiplun MVA Protest March Case: चिपळूणात महाविकास आघाडीचा धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा घ्या, आमदार भास्कर जाधव यांची मागणी

मतचोरी आणि ईव्हीएम घोटाळ्याविरोधात मविआचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

चिपळूण : Chiplun MVA Protest March Case अंतर्गत केंद्रीय निवडणूक आयोग तसेच केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात चिपळूणमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी धडक मोर्चा काढण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा घ्यावा, या प्रमुख मागणीचे निवेदन प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना देण्यात आले.

Chiplun MVA Protest March Case: मोर्चाचे नेतृत्व आणि प्रमुख नेत्यांची उपस्थिती

या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना आमदार भास्कर जाधव आणि काँग्रेसचे नेते व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केले. शहरातील बहादूरशेख चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा चिंचनाका भोगाळे मार्गे मध्यवर्ती बसस्थानकाकडून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला.

Khabardar diwali fest

‘हे सरकार चोरांचे सरकार आहे’: आमदार भास्कर जाधव यांची घणाघाती टीका

मोर्चादरम्यान बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “हे सरकार चोरांचे सरकार असून त्यांनी लोकांची मते, आमदार, खासदार आणि पक्ष चोरले आहेत. ईव्हीएम घोटाळ्यानंतर आता थेट मतचोरी केली जात आहे. ज्ञानेशकुमार यांनी निवडणूक प्रक्रियेतील अर्ज-६ बदलला असून स्थानिक अधिकाऱ्यांना नावे समाविष्ट किंवा बदलण्याचे अधिकार नाहीत, असे सांगत सर्वोच्च न्यायालयानेही यावर फटकारले आहे. त्यामुळे ज्ञानेशकुमार यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा.” याशिवाय जिल्ह्यातील तीन तालुके वगळून सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.

विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कडक पोलिस बंदोबस्त

माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत तिरंगा हातात घेऊन मोर्चाचे नेतृत्व केले. या वेळी पत्रकार युवराज मोहिते, काँग्रेस जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी धाग, भरत लब्धे, शिरीष काट कर, शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, आशिष जाधव, बाळा कदम, फैसल कास्कर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर, अविनाश केळसकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले व पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 08-10-2026