३० कोटी १९ लाखांचा परतावा जमा
रत्नागिरी :
Fruit Crop Insurance Claim Disbursement अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील फळपीक विम्याच्या परताव्याची वाट पाहणाऱ्या बागायतदारांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील ९ हजार १३ बागायतदारांच्या खात्यात ३० कोटी १९ लाख ४६ हजार ३०६ रुपयांहून अधिक रकमेचा परतावा जमा करण्यात आला आहे.
Fruit Crop Insurance Claim Disbursement: परताव्याची रक्कम यंदा वाढली
पुनर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत ही भरपाई देण्यात आली आहे. गतवर्षी (सन २०२४-२५) १०६ कोटी ११ लाख ५९३ रुपये परताव्याची रक्कम जमा करण्यात आली होती. तर यावर्षी एकूण ११८ कोटी २२ लाख ८४ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा १२ कोटी ११ लाख ४९१ रुपये जास्त परतावा मिळाला आहे.
आकडे बोलतात आणि वंचित तालुक्यांना अखेर न्याय
जिल्ह्यातील ३७ हजार ४२० बागायतदारांनी १८ हजार ५२८ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला होता. त्यापैकी २५ हजार ७८० बागायतदारांच्या खात्यात ८८ कोटी ४ लाख ३८ हजार रुपये आधीच जमा झाले होते. परंतु मंडणगड, खेड, राजापूर आणि रत्नागिरी या चार तालुक्यांतील ९ हजार १३ बागायतदार या परताव्यापासून वंचित राहिले होते. अखेर तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या बागायतदारांच्या खात्यात ३० कोटी १९ लाख ४६ हजार रुपये जमा झाल्याने आंबा आणि काजू उत्पादकांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:42 08-10-2026














