चालकाविरोधात खेड पोलिसांत गुन्हा नोंद
Khed Accident News समोर आली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी ओझरवाडी मार्गावर पायी चालत जाणाऱ्या एका अनोळखी वृद्ध इसमास भरधाव बोलेरो पिकअपने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कशेडी ओझरवाडी हायवेवर (ता. खेड) हा अपघात घडला. याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयाचा एक अनोळखी पुरुष इसम (नाव व गाव अज्ञात) महामार्गावरून पायी जात होता. याच वेळी आरोपी नितीन सदाशिव कदम (वय ३७ वर्षे, रा. खडपोली कदमवाडी, ता. खेड) हा आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप (क्र. MH-08-BK-0954) घेऊन मुंबई ते गोवा लेनवरून जात होता.
Khed Accident News: निष्काळजीपणे वाहन चालवल्याने पादचाऱ्यास धडक
रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता आरोपी चालकाने निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालवून महामार्गावरून पायी जाणाऱ्या त्या अनोळखी इसमास जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत संबंधित अनोळखी वृद्धाच्या डोक्याला, पोटाला तसेच दोन्ही पायांवर गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.
पोलीस पाटलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी कशेडी येथील पोलीस पाटील स्वरा समीर गावणकर (रा. कशेडी गावणकरवाडी, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६.४८ वाजता गु.र.नं. ३५८/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार चालक नितीन सदाशिव कदम याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.













