Ganpatipule Temple Samved Swahakar: गणपतीपुळे मंदिरात ‘सामवेद स्वाहाकार’ व पूर्णाहुती सोहळा संपन्न

Ganpatipule Temple Samved Swahakar: गणपतीपुळे मंदिरात 'सामवेद स्वाहाकार' व पूर्णाहुती सोहळा संपन्न

श्रीदेव गणपतीपुळे येथील श्री लंबोदर गणपती मंदिर परिसरात उत्साहात पार पडला

Ganpatipule Temple Samved Swahakar सोहळ्याची सांगता रत्नागिरी तालुक्यातील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे येथील सुप्रसिद्ध श्री लंबोदर गणपती मंदिर परिसरमध्ये समस्त ब्राम्हवृंदांच्या उत्तम नियोजनाद्वारे नुकतीच करण्यात आली. हा धार्मिक कार्यक्रम २१ ऑक्टोबरपासून सकाळी ८ वाजता सुरू झाला असून, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत चालून पूर्ण झाला. कोकणातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपत झालेल्या या सोहळ्यामुळे गणपतीपुळे परिसरामध्ये श्रद्धा व भक्तीचे पवित्र वातावरण अनुभवायला मिळाले.

या धार्मिक अनुष्ठानापूर्वी ऋग्वेद व यजुर्वेद स्वाहाकार गणपतीपुळेतील समस्त ब्राम्हवृंदामार्फत पूर्ण करण्यात आले आहेत. या संपूर्ण महोत्सवाला गणपतीपुळे संस्थानाचे विशेष सहकार्य लाभले. मुख्य आचार्य म्हणून अहिल्यानगर येथील वेदमूर्ती तुकाराम मुळे गुरुजी यांनी पौरोहित्य सांभाळले. त्यांच्यासोबत मुळे गुरुजी यांचे विद्यार्थी शिष्यगण वे.मू. दत्तदास शेवडे गुरुजी (लांजा), वेदवित् मुळे (अ. नगर), सचिन व्यास (नीमच, म.प्र.), जयप्रकाश शर्मा (नीमच, म.प्र.) आणि अभिषेक शर्मा (भीलवाडा, राजस्थान) यांनी मंत्रजागर व पौरोहित्यासाठी आपली उपस्थिती दर्शवली होती.

या सोहळ्यादरम्यान सुहिता आणि डॉ. चैतन्य वासंती वामन घनवटकर दात्याने ब्राम्हवृंद यजमान प्रतिनिधी म्हणून संकल्पपूर्ती केली. भारत देश, सनातन धर्म, भारतीय सैनिक आणि सर्व नागरिक यांच्यासाठी सर्व काही चांगले होवो, अशा प्रकारचा विस्तृत संकल्प व प्रार्थना या विशेष प्रसंगी करण्यात आली. लयबद्ध पद्धतीने झालेला सामवेदाचा मंत्रघोष, गायन आणि स्वाहाकार याद्वारे संपूर्ण श्री गणपती मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

Swami swaru. Pat.