Chiplun Poisoning Death News: आबिटगाव बौद्धवाडीत ५० वर्षीय व्यक्तीचा विषबाधेमुळे मृत्यू

Chiplun Poisoning Death News: आबिटगाव बौद्धवाडीत ५० वर्षीय व्यक्तीचा विषबाधेमुळे मृत्यू

दारूच्या व्यसनामुळे कीटकनाशक प्राशन केलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान अंत; चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

Chiplun Poisoning Death News बाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील आबिटगाव बौद्धवाडी येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा कीटकनाशक प्राशन केल्यामुळे झालेल्या विषबाधेमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ४.५३ वाजताच्या सुमारास डेरवण येथील श्री वालावलकर रुग्णालयात घडली. प्रभाकर गणपत पवार (वय ५०, रा. आबिटगाव बौद्धवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मयत प्रभाकर पवार यांना दारूचे व्यसन होते. गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ते दारू पिऊन घरी आले असता त्यांना अचानक उलट्या सुरू झाल्या. उलट्यांमधून कीटकनाशकाचा उग्र वास येत असल्याचे त्यांच्या पत्नीच्या (खबर देणाऱ्या प्रियांका राजेश जाधव यांच्या आई) लक्षात आले. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीन त्यांना उपचारासाठी डेरवण येथील श्री वालावलकर रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात सखोल उपचार सुरू असतानाच ७ नोव्हेंबर रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पवार यांनी कीटकनाशक औषध प्राशन केल्यामुळे तीव्र विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
या प्रकरणी मयताची मुलगी प्रियांका राजेश जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वयेट आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Jadhav acadamy