जेल नाका परिसरात पोलिसांनी रचला सापळा; ४ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन आणि मोटारसायकल जप्त
Ratnagiri Drug Bust Case बाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी शहरातील जेल नाका परिसरात केलेल्या धडक कारवाईत, ‘ब्राऊन हेरॉईन’ या प्रतिबंधित अमली पदार्थासह एका २१ वर्षीय तरुणाला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या यशस्वी कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थासह एक मोटारसायकल असा एकूण १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नुफेरअली खालीद तांडेल (वय २१ वर्षे, रा. गाजीमोहल्ला, वरचा वाडा, मशिदीजवळ, साखरी नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक जेल नाका परिसरात नियमित नाकाबंदी आणि गस्त घालत असताना, संशयित हालचाली आढळल्यामुळे पोलिसांनी नुफेरअली तांडेल याला रोखून त्याची अंगझडती घेतली.
Ratnagiri Drug Bust Case: झडतीत आढळले ४ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन

पोलीस पथकाने घेतलेल्या झडतीदरम्यान आरोपीकडे ४ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी अमली पदार्थासह त्याच्या ताब्यातील मोटारसायकल जप्त करत एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कारवाईनंतर आरोपी तरुण आणि जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर व दंडात्मक कारवाईसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
अमली पदार्थांच्या विरोधातील ही यशस्वी मोहीम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने फत्ते केली. या धडक पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, वैभव मोरे, गणेश सावंत आणि अतुल कांबळे यांचा सहभाग होता. रत्नागिरी शहरात अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी उचललेल्या या कठोर पावलामुळे ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणले आहेत.













