Ratnagiri Footpath Encroachment: रत्नागिरी शहरात पदपथ झाले; पुन्हा अतिक्रमणही वाढले!

Ratnagiri Footpath Encroachment: रत्नागिरी शहरात पदपथ झाले; पुन्हा अतिक्रमणही वाढले!

पायचालकांना मनस्ताप; अपूर्ण कामांमुळे आणि अतिक्रमाणामुळे पदपथांवरून चालणे झाले कठीण

Ratnagiri Footpath Encroachment बाबत मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरात सध्या पदपथांचे (फूटपाथ) काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला नवीन पदपथांचे काम सुरू झाल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता आणि त्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, आता यातील अनेक ठिकाणी नवीन पदपथांवरच पुन्हा दुकाने व टपऱ्यांचे अतिक्रमण वाढू लागले आहे.

त्याचप्रमाणे शहरातील अनेक भागांत पदपथांची कामे अद्याप पूर्णत्वास गेलेली नाहीत. ठिकठिकाणी रस्ते आणि पदपथ अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना त्यावरून चालणे अत्यंत कठीण झाले आहे. पदपथाचे काम एका मार्गाने शिस्तबद्ध रीतीने पूर्ण होणे अत्यंत गरजेचे असून, प्रशासनाने या अतिक्रमाणावर तातडीने कारवाई करावी, अशी रास्त अपेक्षा रत्नागिरीकर नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Shanti2