Ratnagiri Badminton Tournament: रत्नागिरीत २८ व २९ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा; ९ ते १९ वर्षांखालील मुला-मुलींसाठी सुवर्णसंधी

Ratnagiri Badminton Tournament: रत्नागिरीत २८ व २९ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा; ९ ते १९ वर्षांखालील मुला-मुलींसाठी सुवर्णसंधी

रत्नागिरी सिटी बॅडमिंटन असोसिएशनतर्फे आयोजन; मारुती मंदिर येथील शिवाजी स्टेडियमवर रंगणार सामने

Ratnagiri Badminton Tournament बाबत मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी सिटी बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील ९ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी २८ व २९ नोव्हेंबर रोजी रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील शिवाजी स्टेडियममध्ये जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील नवोदित खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील कौशल्याला वाव देणे आणि जिल्ह्यात बॅडमिंटन खेळाला प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची तसेच स्पर्धेचा अनुभव घेण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

Ratnagiri Badminton Tournament: संपर्क व आवाहन
इच्छुक खेळाडूंनी प्रवेश प्रक्रिया आणि अन्य माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

सरोज सावंत (९४२०३०९९५७)

Shanti 4

नेहा गोखले (९३५९८६३३४९)

रत्नागिरी सिटी बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष प्रसन्न आंबेुलकर यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुला-मुलींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.