नवीन जिल्हा कार्यकारिणी घोषित; राज्य अध्यक्ष राजेंद्र खैरनार यांच्या उपस्थितीत झाली घोषणा
Maharashtra State Center Head Federation Ratnagiri बाबत मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख व अधिकारी महासंघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी दीपक नागवेकर यांची, तर सचिवपदी विशाल घोलप यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांच्या उपस्थितीत राज्य अध्यक्ष राजेंद्र खैरनार यांनी नवीन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी राज्य निरीक्षक म्हणून जळगावचे गणेश राऊत आणि कोल्हापूरचे विक्रम वागरे उपस्थित होते.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि केंद्रप्रमुख व अधिकारी यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण काम करत राहू, अशी ग्वाही नूतन जिल्हाध्यक्ष दीपक नागवेकर आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीने दिली आहे.
नूतन जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी
या घोषणेनुसार रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीतील अन्य पदाधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

जिल्हा मार्गदर्शक: दत्तात्रय वाघमारे (खेड)
कार्याध्यक्ष: उजेर शेख (दापोली) आणि संदीप कंदुरकर (खेड)
कोषाध्यक्ष: बालाजी बोंबळे (चिपळूण)
महिला आघाडी अध्यक्ष: वृषाली हेळेकर (राजापूर)
महिला आघाडी उपाध्यक्ष: पल्लवी पवार (गुहागर)
कायदेविषयक सल्लागार: प्रमोद गुंजाळ (दापोली)
जिल्हा उपाध्यक्ष: सूरज जाधव (राजापूर) आणि चंद्रकांत कोरबू (खेड)
सहसचिव: अमोल कोंडुस्कर (राजापूर)
सहकोषाध्यक्ष: अशोक तांदळे (मंडणगड)
जिल्हा संघटक: रवींद्र जाधव (लांजा)
नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













