२०२४-२५ या वर्षासाठी मुंबई विभागस्तरीय ‘ग्रंथमित्र’ पुरस्काराची घोषणा; वाचनसंस्कृती संवर्धन आणि वाचक सेवेची दखल
Ratnagiri Librarian Award संदर्भात रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. हळदणकर यांना सन २०२४-२५ या वर्षासाठी ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) – विभागस्तरीय पुरस्कार (मुंबई विभाग)’ जाहीर झाला आहे. ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी, वाचकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आणि ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची यथोचित पावती म्हणून हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
सौ. हळदणकर या गेली अनेक वर्षे रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात कार्यरत असून, त्यांच्या या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेचा गौरव या पुरस्काराच्या निमित्ताने होत आहे. राज्यस्तरीय विभागस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.














