Ravindra Chavan vs Rahul Gandhi: ‘सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी कराल तर याद राखा’; रवींद्र चव्हाण यांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

Ravindra Chavan vs Rahul Gandhi: 'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी कराल तर याद राखा'; रवींद्र चव्हाण यांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

२०११ आणि २०२४ च्या G20 परिषदेतील छायाचित्रांचा आधार; २०१४ पूर्वीचा आणि नंतरचा भारत यातील फरक केला अधोरेखित

Ravindra Chavan vs Rahul Gandhi संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि जागतिक व्यासपीठावरील भारताच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी अत्यंत आक्रमक आणि सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. ‘२०१४ पूर्वीचा भारत’ आणि ‘२०१४ नंतरचा भारत’ यातील नेमका फरक दोन आंतरराष्ट्रीय छायाचित्रांच्या माध्यमातून अधोरेखित करत चव्हाण यांनी राहुल गांधींच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या एकत्रित छायाचित्राचा आधार घेत राहुल गांधी यांनी भारताच्या जागतिक भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. या टीकेला रवींद्र चव्हाण यांनी पुराव्यानिशी उत्तर दिले आहे.

Ravindra Chavan vs Rahul Gandhi: दोन छायाचित्रांच्या माध्यमातून दिला पुरावा
राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर दोन महत्त्वाची छायाचित्रे शेअर केली आहेत:

Arihant 2

२०११ मधील G20 परिषद (फ्रान्स): या छायाचित्रात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक नेत्यांच्या मागील रांगेत उभे असल्याचे दिसत आहे.

२०२४ मधील G20 परिषद (रिओ दि जानेरो): या छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व जागतिक नेत्यांच्या मध्यभागी म्हणजेच केंद्रस्थानी उभे असल्याचे दिसत आहे.

या दोन्ही फोटोंच्या माध्यमातून मोदींच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर भारताची वाढलेली प्रतिष्ठा आणि ताकद रवींद्र चव्हाण यांनी अधोरेखित केली आहे.

रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींना थेट इशारा
राहुल गांधींच्या भूमिकेवर कठोर शब्दांत प्रहार करताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, "भूक सहन होईनाशी झाली की आपल्याला त्यापुढे काहीही दिसेनासं होतं. सत्तेच्या भुकेपुढे राहुलजींचीही हीच अवस्था झाली आहे. या सत्तेच्या भुकेपोटी जर भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा. कोणताही सच्चा भारतीय हे कधीही खपवून घेणार नाही."

राजकीय सत्तासंघर्षापलीकडे देशाची जागतिक प्रतिष्ठा अधिक महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसच्या धोरणांवर थेट निशाणा साधला आहे.