Ratnagiri News: जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाला ३१ मार्च ‘डेडलाइन’; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे कडक निर्देश

Ratnagiri News: जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाला ३१ मार्च 'डेडलाइन'; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे कडक निर्देश

१४ वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण करण्याचे आदेश; जलतरण तलावासाठी ५० लाखांचा निधी व रत्नागिरीत पहिले मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

Ratnagiri Sports Complex Deadline संदर्भात "तब्बल १४ वर्षे उलटूनही जिल्हा क्रीडा संकुलाचे काम अद्याप अपूर्ण राहणे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. संथगतीने सुरू असलेल्या या कामाला आता गती द्यावी आणि ३१ मार्च २०२७ या अंतिम मुदतीपर्यंत हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे," असे स्पष्ट आणि कडक निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते.

Ratnagiri Sports Complex Deadline व क्रीडा सुविधांबाबत कठोर भूमिका
बैठकीत पालकमंत्री डॉ. सामंत यांनी जिल्हा क्रीडा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या संकुलाच्या बांधकामाचा सविस्तर आढावा घेत कामाच्या मंद गतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. बांधकाम अपूर्ण असल्याचा गैरफायदा घेत संकुलाच्या इमारतीत अवैध धंदे सुरू असल्याची बाब यावेळी समोर आली. याची गंभीर दखल घेत त्यांनी पोलीस प्रशासन आणि क्रीडा विभागाला तातडीने कारवाई करण्याचे व परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे आदेश दिले.

Infigo eyecare

क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट आणि इतर क्रीडा सुविधांचा वापर केवळ संबंधित खेळ आणि खेळाडूंच्या सरावासाठीच व्हावा आणि या वास्तूंचा इतर कोणत्याही कारणांसाठी वापर करू नये, अशी सक्त ताकीद डॉ. सामंत यांनी दिली. तसेच साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या नूतनीकरण व दुरुस्तीच्या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व पुरस्काराचा गौरव
बैठकीत इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात आले:

मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र: रत्नागिरी येथे जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधीतून साकारणारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व पोलीस प्रशिक्षण केंद्र हे संपूर्ण महाराष्ट्रातील पहिलेच नाविन्यपूर्ण केंद्र ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य, पायाभूत सुविधा व पोषक वातावरण मिळावे, यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

ग्रंथपाल मीनल हळदनकर यांचा गौरव: रत्नागिरी नगर वाचनालयाच्या ग्रंथपाल मीनल हळदनकर यांना सन २०२४-२५ या वर्षाचा विभागस्तरीय ‘डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.