Khashaba Jadhav Padma Award News: खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याचा मार्ग मोकळा होणार? उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे निर्देश

Khashaba Jadhav Padma Award News: खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याचा मार्ग मोकळा होणार? उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे निर्देश

२५ वर्षांच्या लढ्याला आशेचा किरण; राज्य सरकारच्या शिफारसीसह सर्व कागदपत्रांचा अभ्यास करून गांभीर्याने विचार करण्याचे आदेश

Khashaba Jadhav Padma Award News संदर्भात स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने केंद्र आणि राज्य सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने केलेल्या शिफारसीसह सर्व कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार देण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला आता मोठे यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजीत जाधव यांनी वडिलांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा यासाठी गेल्या अडीच दशकांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांनी वेळोवेळी केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रस्तावही पाठवले, मात्र ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी करताना गुरुवारी कोल्हापूर सर्किट बेंचने केंद्र आणि राज्य सरकारला निर्देश दिले. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी ज्येष्ठ उद्योगपती धीरूभाई अंबानी यांना निधनानंतर १४ वर्षांनी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचा दाखला देत खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार का दिला जात नाही, असा सवाल उपस्थित केला. आता केंद्र सरकार आणि पद्म पुरस्कार समितीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Khashaba Jadhav Padma Award News: खाशाबा जाधव यांचा जीवनप्रवास व ऐतिहासिक कामगिरी
खाशाबा जाधव यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:

Amey jwelrs

जन्म आणि जडणघडण: १५ जानेवारी १९२६ रोजी सातारा जिल्ह्यातील कराडजवळील गोळेश्वर येथे खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्म झाला. प्रसिद्ध पैलवान असलेल्या वडिलांमुळे लहानपणापासूनच कुस्ती व मातीशी नाते जोडले गेले. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली आणि अनेक अडचणींवर मात करत त्यांनी जिद्दीने वाटचाल केली.

१९४८ लंडन ऑलिम्पिक: तोपर्यंत केवळ मातीच्या आखाड्यात सराव केलेले असतानाही आंतरराष्ट्रीय मॅटवर त्यांनी १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट गटात सहावे स्थान मिळवले.

१९५२ हेलसिंकी ऑलिम्पिकमधील इतिहास: हेलसिंकी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर आर्थिक अडचण असताना राजाराम कॉलेजच्या तत्कालीन प्राचार्यांनी स्वतःचे घर बँकेत गहाण ठेवून सुमारे ७ हजार रुपयांची रक्कम उभी केली आणि त्यांना हेलसिंकीला पाठवले. या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या फ्लायवेट गटात कांस्यपदक जिंकत ते स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू ठरले.