रत्नागिरीतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयंतीलाल जैन यांच्या ‘जैनम कन्स्ट्रक्शन्स’च्या नूतन कार्यालयाचा उद्योजक अण्णा सामंत यांच्या हस्ते दिमाखदार शुभारंभ!

रत्नागिरीतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयंतीलाल जैन यांच्या ‘जैनम कन्स्ट्रक्शन्स’च्या नूतन कार्यालयाचा उद्योजक अण्णा सामंत यांच्या हस्ते दिमाखदार शुभारंभ!

नाचणे रोडवरील अभ्युदय नगर बसस्टॉपजवळ भव्य कार्यालय सुरू; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

रत्नागिरी :
रत्नागिरीतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयंतीलाल जैन यांच्या ‘जैनम कन्स्ट्रक्शन्स’ (Jainam Constructions) या संस्थेच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ आज शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सुप्रसिद्ध उद्योजक श्री. आर. डी. तथा अण्णा सामंत यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात व दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला. रत्नागिरी शहरातील नाचणे रोडवरील अभ्युदय नगर बसस्टॉपजवळ असलेल्या ‘युनिटी डेझी’ (Unity Daisy) इमारतीमधील ऑफिस क्रमांक ०३ येथे हे अद्ययावत कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

मान्यवरांची उपस्थिती आणि सदिच्छा भेट :
या उद्घाटन सोहळ्यानिमित्त शहरातील बांधकाम, उद्योग, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी ‘रत्नागिरी खबरदार’चे संपादक हेमंत वणजू, नगरसेवक सौरभ मलुष्टे आणि एस. एस. कम्युनिकेशनचे अमोल डोंगरे यांनी या नूतन कार्यालयास सदिच्छा भेट देत बांधकाम व्यावसायिक जयंतीलाल जैन आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले व पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Amey jwelrs