दुपारी १ ते २ या वेळेत सभागृहात आयोजन; आधी तालुका लोकशाही दिनात अर्ज करणे आवश्यक
Ratnagiri Lokshahi Din December 7 संदर्भात नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा डिसेंबरचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात दुपारी १ ते २ या वेळेत होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Ratnagiri Lokshahi Din December 7 साठी प्रशासनाचे नियम
लोकशाही दिनात प्रश्न मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनाने पुढील महत्त्वाचे नियम केले आहेत:

अर्जदाराने आपला अर्ज विहीत नमुन्यात दोन प्रतींमध्ये व लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावा.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात थेट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
त्यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.













