आईच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहितेनुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंद
Dapoli Missing Girl प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आसद तुळशीमोहल्ला येथून एका २४ वर्षीय तरुणीच्या बेपत्ता होण्याची घटना समोर आली आहे. आंबवली येथे कपडे आणण्यासाठी जाते, असे सांगून घरातून बाहेर पडलेली अफशीन कलंदर ऐनरकर (वय २४ वर्षे, रा. आसद तुळशीमोहल्ला, ता. दापोली) ही तरुणी शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून बेपत्ता झाली आहे. तिला कोणीतरी अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत तिच्या आईने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अन्वरी कलंदर ऐनरकर (वय ४५ वर्षे, रा. आसद तुळशीमोहल्ला, ता. दापोली) यांची मुलगी अफशीन ही शुक्रवारी सकाळी आंबवली गावात कपडे आणायला जाते असे सांगून घरातून निघाली होती. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही.
Dapoli Missing Girl: कुटुंबीयांकडून आंबवलीसह परिसरात कसून शोध
अफशीन सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तातडीने आंबवली गावात जाऊन तिचा शोध घेतला. तेथे ती आढळून न आल्याने नातेवाईक, शेजारी तसेच आजूबाजूच्या परिसरात तिचा कसून शोध घेण्यात आला.

सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याची खात्री फिर्यादी अन्वरी ऐनरकर यांची झाली.
दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
त्यानुसार अन्वरी ऐनरकर यांनी शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.२७ वाजता दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गु.र.नं. २५७/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १४०(३) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.













