Chiplun Accident News: सुरूर येथे कार उलटून चिपळुणातील बाप-लेकीचा मृत्यू; जावई, सासू व मुलगा गंभीर जखमी

Chiplun Accident News: सुरूर येथे कार उलटून चिपळुणातील बाप-लेकीचा मृत्यू; जावई, सासू व मुलगा गंभीर जखमी

पुणे-बेंगळूर महामार्गावर घडला; वर्षश्राद्धासाठी चिपळूणकडे जाताना दुर्घटना, भुईंज-वेळे दरम्यान विशेष यंत्रणेची मागणी

Chiplun Accident News समोर आली असून, पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारानजीक सुरूर येथे झालेल्या भीषण कार अपघातात चिपळूण तालुक्यातील बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी (ता. २१) सकाळी ही घटना घडली असून, या अपघातात कारचा चक्काचूर झाला. वर्षश्राद्धाच्या निमित्ताने कुटुंबासह चिपळूणकडे जात असताना सातारानजीक गाडीवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकून तीन ते चार वेळा उलटली. या दुर्घटनेत विजय धोंडू पवार (वय ७०, मूळ रा. अनारी, सध्या रा. खेर्डी देऊळवाडी) आणि त्यांची मुलगी वैष्णवी वैभव कदम (वय ४३, रा. वडेरू, सध्या रा. पुणे) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर जावई वैभव वामन कदम (वय ४५, मूळ रा. वडेरू, ता. चिपळूण, सध्या रा. पुणे), सासुबाई वैशाली विजय पवार (वय ६२) आणि मुलगा वेदांत वैभव कदम (वय १३) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव कदम हे आपले सासू-सासरे, पत्नी आणि मुलाला सोबत घेऊन गावी निघाले होते. दिवाळीच्या सुट्टीसाठी आलेल्या आई-वडिलांना परत गावी सोडण्यासाठी आणि चिपळूण येथे होणाऱ्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला जाण्यासाठी ते प्रवास करत होते.

Chiplun Accident News: ताबा सुटून कार दुभाजकाला धडकली आणि उलटली
सातारानजीक सुरूर परिसरात आले असता चालक असलेल्या वैभव कदम यांचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार दुभाजकाला जाऊन धडकली आणि त्यानंतर ती तीन ते चार वेळा उलटली.

Pednekar sankul

या अपघातात सासरे विजय पवार आणि त्यांची मुलगी वैष्णवी कदम यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अपघातस्थळाचे दृश्य भयावह होते आणि घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.

जखमींवर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार; अपघातस्थळी विशेष यंत्रणेची मागणी
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वैभव कदम, वैशाली पवार आणि वेदांत कदम यांच्यावर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, भुईंज आणि वेळे या दरम्यान दररोज वाढणारे अपघात लक्षात घेऊन जिल्हा पोलीस दलाने या पट्ट्यात विशेष यंत्रणा उभी करावी, अशी मागणी पुढे आली आहे.