खाडी पट्ट्यात ना. उदय सामंत यांच्या प्रचाराचा झंझावात..

◼️ एका दिवसात 13 आढावा बैठका

रत्नागिरी : संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील कसबा जिल्हा परिषद गटा मधील फुणगुस पंचायत समिती गण तसेच नावडी पंचायत समिती गणातील विविध गावांमध्ये महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तसेच रत्नागिरी -रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या प्रचाराचा वेग शिगेला पोहोचला आहे.

फुणगुस पंचायत समिती गणातील मेढे, मांजरे, उपळे, डावखोळ, कोंडे , पोचरी, देणं, डिंगणी, पिरंदवणे, फुणगुस ,परचुरी तसेच नावडी पंचायत समिती गणातील आंबेड, सोनगिरी या एकूण 13 गावांमध्ये शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री गजानन उर्फ आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत आढावा बैठका संपन्न झाल्या. या बैठकीना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या या प्रत्येक आढावा बैठकी साठी विधानसभा क्षेत्र प्रमुख आबा पाटील यांच्या समवेत उपजिल्हाप्रमुख श्री प्रकाश साळवी, उपजिल्हाप्रमुख श्री राजेश मुकादम, महायुती समन्वयक श्री सुदेश मयेकर, उपतालुकाप्रमुख श्री पर्शुराम वेल्ये, विभाग प्रमुख श्री महेश देसाई, उपविभाग प्रमुख योगेश मुकादम, विभाग संघटक मनमोहन उर्फ काका देसाई, नावडी पंचायत समिती गणा चे उपविभाग प्रमुख श्री अतिष पाटणे, निरीक्षक श्री अँड .श्री तुषार नागवेकर, कोतवडे जिल्हा परिषद गटाचे विभाग संघटक व माजी सरपंच श्री तुफिल पटेल तसेच प्रत्येक गावातील शाखाप्रमुख, उप शाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवदूत, बूथ कमिटी प्रमुख, महिला व युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shree clinic

खाडी पटातील या बैठकांमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. कोणत्याही आमदारांनी यापूर्वी असं काम केलं नाही एवढे काम नामदार उदय सामंत यांनी केले आहे. त्यामुळे खाडी पट्ट्यातील कार्यकर्त्यांनी नामदार उदय सामंत यांना जास्तीत जास्त मताधिक्य या पंचायत समिती गणातून आम्ही देऊ, असे ठामपणाने यावेळी प्रतिपादन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 12-11-2024