पावस येथे शेख महंमद पीर उरूस 15 नोव्हेंबर पासून

पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील शेख महंमद पीर यांचा उरूस १५ नोव्हेंबरपासून सुरवात होणार आहे.

हजरत महंमद पीर २२५ वर्षांपूर्वी पैगंबरवासी झाले. तेव्हापासून त्यांचा उरूस रत्नागिरी कार्तिक पौर्णिमा दिवशी साजरा होत आहे. शेख महंमद पीर ट्रस्टची स्थापना १९५२ मध्ये पैगंबरवासी आदमखान महंमदखान फडनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

पावस येथे सालाबादप्रमाणे शेख महंमद पीर दर्गा उरूस १५ नोव्हेंबरला रात्री १० वा. मिरवणुकीने येऊन समाधीवर चंदन चढवून सुरवात होणार आहेत. १६ नोव्हेंबरला रात्री साडेदहा वा. शेख महंमद बाबांच्या समाधीवर सामुदायिक पद्धतीने महावस्त्र (गिलाफ) परिधान करण्यात येणार आहेत. १७ ला उरूसाचा सांगता समारंभ भाविकांना दर्शनासोबत महाप्रसादाने होणार आहे. सर्व भाविकांनी या उरूसास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 12-11-2024

Ratnagiri Khabardar add image